रीकामा झोका
आहे सगळे मनासारखे
तरीही एक अनामिक हुरहूर
आहे लागून राहिली
भरलेल्या दिवसांनंतर
सायंकाळ च्या कातरवेळी
कोणाची मी वाट पाहते
कशाचा मी शोध घेते
काय आहे जे मज त्यावेळी
खुणावते, जवळ बोलावते
उंच उंच झोक्यांवर
वारा माझ्या केसात खेळतो
दिवसाचा सूर्य मज
खुणावतो, गवसणी घालतो
त्या उंच भारार्यानंतर
वारा शांत होतो
सूर्य ही मावळतो
आणि मग तो रिकामा झोका
परत हुरहूर घेवून येतो
आहे सगळे मनासारखे
तरीही एक अनामिक हुरहूर
आहे लागून राहिली
भरलेल्या दिवसांनंतर
सायंकाळ च्या कातरवेळी
कोणाची मी वाट पाहते
कशाचा मी शोध घेते
काय आहे जे मज त्यावेळी
खुणावते, जवळ बोलावते
उंच उंच झोक्यांवर
वारा माझ्या केसात खेळतो
दिवसाचा सूर्य मज
खुणावतो, गवसणी घालतो
त्या उंच भारार्यानंतर
वारा शांत होतो
सूर्य ही मावळतो
आणि मग तो रिकामा झोका
परत हुरहूर घेवून येतो

